सगळा वाराच थांबलाय
आवाज बंद झालेयत
पण भोंगे वाजातायत
दुकाने झग्मग्तायत
एसी चे झोत सोडतायत
सुंदर मुली गाणी गातायत
सुंदर मुले प्रचंड आनंदाने हसतायत
लाल इमारतींमधे खा-प्यायला वारेमाप आहे
अतोनात जागा आहे झोपायला...
ते गेलेत पण .
ते गेलेले आहेत.
आणि गल्लोगल्लीचे घाशिराम घाम पुसत घरी निघलेत.
No comments:
Post a Comment